शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का?

By प्रविण मरगळे | Published: October 07, 2019 7:50 PM

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली.

प्रविण मरगळे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-भाजपा मित्रपक्षाची महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राज्यात मोठा भाऊ म्हणून भाजपाने शिवसेनेला १२४ जागा देत स्वत:कडे १५० जागा घेतल्या आणि मित्रपक्ष रासपा, रयतक्रांती, आरपीआय, शिवसंग्राम यांना १४ जागा सोडण्याचं जाहीर केलं. पण प्रत्यक्षात मित्रपक्षांच्या नावे भाजपाने मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर लढण्यास भाग पाडलं. 

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. ज्या २ जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आल्या त्याठिकाणीही भाजपाने महायुतीच्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन भाजपाच्या चिन्हावर लढविण्याची तयारी केली. याची कल्पना येताच महायुतीत रासप पक्ष नाराज झाला पण इकडं आड अन् तिकडं विहीर अशी परिस्थिती रासपची झाली असल्याचं महादेव जानकर यांनी मान्य केलं. युतीत राहूनही रासप आणि इतर मित्रपक्षांना नावापुरत्या जागा सोडण्यात आल्या पण प्रत्यक्षात याठिकाणी असलेले सर्व उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असल्याने मित्रपक्षाच्या हाती भोपळाच आला असचं चित्र पाहायला मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपात यांच्यात तडजोडीचं राजकारण झालं. अमित शहा यांनी  मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत एक जागा वाढवून देण्यात आली. या भेटीतच विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाचे नेते सांगतात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात समसमान जागावाटप होईल असं बोलणाऱ्या शिवसेनेचाही सूर नरमल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत १२४ जागांवर शिवसेना, भाजपा १५० जागांवर तर मित्रपक्ष १४ जागांवर निवडणूक लढणार असून महायुती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केली. 

आरपीआयचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि रासपचे महादेव जानकर यांना १४ जागा देण्याचं आश्वासन भाजपाने दिले. मात्र या १४ जागांवरही महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे या १४ मतदारसंघात निवडून येणारे उमेदवार हे नावापुरते मित्रपक्षांचे आमदार असतील पण प्रत्यक्षात कागदोपत्री ते भाजपाचेच आमदार म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा १६४ तर शिवसेना १२४ अशाच प्रकारे जागांचे वाटप ग्राह्य धरता येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना वेगवेगळे लढल्याने त्यांना प्रत्येकी १२२ आणि ६३ जागा मिळाल्या होत्या. बहुमत न मिळाल्याने भाजपाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता चालविण्यासाठी सोबत घ्यावं लागलं.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष सरकार चालविलं असं कौतुक केलं पण आगामी निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना पूर्ण बहुमत द्यावं असं आवाहन करत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता. तरीही शिवसेनेला सोबत घेऊन जास्तीत जास्त भाजपाच्या जागा निवडून आणण्याचा हा भाजपाची खेळी आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्येत वाढ होऊन भविष्यात कमळाचं बहुमत आलं तर यापुढे शिवसेना भाजपाच्या दबावाखालीच राहील अशी पुरेपुर काळजी भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahadev Jankarमहादेव जानकरRamdas Athawaleरामदास आठवलेSadabhau Khotसदाभाउ खोत Vinayak Meteविनायक मेटेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019