शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 3:14 PM

तीन दशकं मुस्लिम खासदार न पाहिलेलं राज्य

अहमदाबाद: गेल्या 30 वर्षांपासून गुजरातनं एकही मुस्लिम खासदार निवडून दिलेला नाही. जवळपास 10 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या गुजरातमध्ये यंदाही याचीच पुनरावृत्ती होणार का, याचं उत्तर 23 मे रोजी मिळेल. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र 1989 मध्ये भाजपाच्या चंदू देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे 1989 पासून गुजरातनं मुस्लिम खासदार पाहिलेला नाही. गुजरातमध्ये सध्या 9.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतल्यास, 1962 मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडून आले. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) अशा दोन उमेदवारांवर जनतेनं विश्वास दाखवला. एकाच निवडणुकीत दोन मुस्लिम खासदार निवडून देण्याची गुजरातची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. गुजरात भाजपासाठी हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजपानं कधीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसनं 2014 पर्यंत राज्यात 15 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले. यावेळी काँग्रेसनं फक्त भरुचमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. भरुच मतदारसंघात मुस्लिमांचं प्राबल्य आहे. या मतदारसंघात 15.64 लाख मतदार आहेत. यातील 22 टक्के मतदार मुस्लिम आहेत. तर अहमदाबाद पश्चिममध्ये 25 टक्के मुस्लिम मतदार आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्येदेखील मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा गांधीनगरमधून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019GujaratगुजरातAhmed Patelअहमद पटेलcongressकाँग्रेसBJPभाजपाMuslimमुस्लीम