शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सिद्धूंची बोलंदाजी थांबणार; 28 दिवसांमध्ये 80 रॅली केल्यानंतर आवाज बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 7:05 PM

घशावर परिणाम झाल्यानं सिद्धूंना सक्तीची विश्रांती

चंदिगड: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधानांनी, जोरदार टोलेबाजीनं चर्चेत असलेले काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या घशावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना प्रचारसभांमध्ये भाषण करता येणार नाही. सध्या सिंग यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना प्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सततच्या भाषणांमुळे सिद्धू यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयानं दिली. सध्या सिद्धू डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेल्या सिद्धूंनी गेल्या काही दिवसांत अनेक विधानं केली आहेत. त्यामुळे मोठे वादही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदूरमधल्या एका जनसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नव्या नवरीशी केली. पंतप्रधान मोदी नव्या नवरीसारखे आहेत. नवी नवरी काम कमी करते. पण तिच्या बांगड्यांचा आवाज जास्त असतो. मी काम करते आहे, असं इतरांना कळावं यासाठी नवी नवरी बांगड्यांचा आवाज करते. मोदी सरकारच्या काळात हेच झालं, असं विधान सिद्धूंनी केलं होतं. काळ्या इंग्रजांना सत्तेबाहेर फेका, असं वादग्रस्त वक्तव्य सिद्धू यांनी केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 'मोदी केवळ खोटं बोलतात. त्यांच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे,' असं सिद्धू म्हणाले होते. डासाला (मच्छरला) कपडे घालणं. हत्तीला कुशीत घेणं आणि मोदींकडून सत्य वदवून घेणं अशक्य आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस