शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Opinion Poll: भाजपा उत्तर प्रदेश राखणार; पण 23 जागा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:33 PM

सपा-बसपाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली: सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या, दिल्लीचं प्रवेशद्वार मानला जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपाला 23 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मित्रपक्षासह तब्बल 73 जागा जिंकत उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यंदा भाजपाच्या जागा 50 वर येण्याचा अंदाज टाईम्स नाऊ-व्हीएमआरनं वर्तवला आहे. तर समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीला 27 जागा मिळतील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे. काँग्रेसनं पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. मात्र याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत नाही. काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील जागा 2 वरुन 3 वर जातील, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एनडीएला 2014 मध्ये 43.30 मतदारांनी कौल दिला. त्यावेळी त्यांना 73 (भाजपा 71, अपना दल 2) जागा मिळाल्या होत्या. आता करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 45.10 टक्के मतं मिळू शकतात. मात्र त्यांच्या जागा 23 नं कमी होऊन 50 वर येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढत असली तरी, सपा-बसपाच्या महाआघाडीमुळे भाजपाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सपा, बसपानं 2014 मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी सपाला 5 जागा मिळाल्या होत्या. तर बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र या दोघांच्या मतांची एकत्रित टक्केवारी 42.70 टक्के इतकी होती. मात्र आता त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये पाच टक्क्यांची घट होऊ शकते. यंदा त्यांना 27 जागा मिळू शकतात. काँग्रेसची कामगिरी उत्तर प्रदेशात फारशी चांगली होण्याची शक्यता नाही. काँग्रेसला 2014 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. राहुल गांधी अमेठी, तर सोनिया गांधी रायबरेलीतून बाजी मारली होती. त्यावेळी काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी 8.40 इतकी होती. यंदा काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढू शकते. काँग्रेसच्या मतांमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा काँग्रेसला 3 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस