शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नाराज अनिल गोटेंचा भाजपाला रामराम; अपक्ष अर्ज भरुन देणार भामरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 4:33 PM

सुभाष भामरेंविरोधात गोटे शड्डू ठोकणार

धुळे: भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटेंनीभाजपाला रामराम केला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अनिल गोटे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे धुळ्यात भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. अनिल गोटे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. तर विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिला. उद्या ते लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हानाचा सामना करावा लागेल.स्थानिक राजकारणात फारसं महत्त्वं दिलं जात नसल्यानं गोटे पक्षापासून दूर गेले होते. जलसंपदा गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्राबल्यामुळे गोटे नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाची स्थापना करत उमेदवार उभे केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. यानंतर गोटे पक्षापासून आणखी दूर गेले. गेल्याच महिन्यात गोटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. गोटे 26 वर्षांचं वैर विसरुन पवारांच्या भेटीला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हाच गोटेंनी भामरेंविरोधात शड्डू ठोकमार असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली होती. 'धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे,' असं गोटे म्हणाले होते. 'मी माझी भूमिका शरद पवारांना सांगितली आहे. मला माझा पक्ष स्वच्छ करायचा आहे. आता मला कशी मदत करायची, हा त्यांचा निर्णय असेल,' असंदेखील गोटेंनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAnil Goteअनिल गोटेdhule-pcधुळेBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे