शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:51 AM

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी सोमय्याचे प्रयत्न सुरू

मुंबई: महापालिका निवडणुकीवेळी थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजपा युती झाली असली, तरी शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावरील राग कायम आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळेच आता सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही. शिवसैनिकांचा राग दूर करण्यासाठी किरीट सोमय्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना मातोश्रीवरुन भेट नाकारण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सोमय्यांकडून सुरू आहे. मात्र अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी भाजपा-शिवसेना आमनेसामने होती. त्यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत माफियाराज असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना सोमय्या यांनी 'बांद्र्याचा बॉस' असे शब्द वापरले होते. यानंतर शिवसेना-भाजपा एकत्र आले. मात्र उद्धव ठाकरेंवर सोमय्या यांनी केलेली जहरी टीका आजही शिवसैनिकांच्या लक्षात आहे. ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का, याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी सोमय्या यांचे प्रयत्न सुरू असताना काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी काल (27 मार्च) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याशिवाय या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गटनेते मनोज कोटक, पराग शाह, मंत्री प्रकाश मेहता उत्सुक असल्याचं समजतं.निवडणुकीच्या आधी शिवसेना-भाजपाचा युती जाहीर झाली त्यानंतर अनेक ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याची उदाहरणं आहेत. मात्र ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपानं किरीट सोमय्यांऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत