शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

VIDEO: राहुल गांधी गोंधळले; मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं घेताना चुकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 3:54 PM

राहुल गांधींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

निमच: मुख्यमंत्र्यांची नावं घेताना चुकल्यानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांचा उल्लेख करताना राहुल गांधींचा गोंधळ झाला. राहुल गांधींनी जनसभेला संबोधित करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. मात्र आपल्याच मुख्यमंत्र्यांची नावं घेताना त्यांनी चूक केली. 14 मे रोजी मध्ये निमचमध्ये हा प्रकार झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भूपेश बघेलजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हुकूम सिंह कराडाजी, असं म्हणत राहुल यांनी भाषणाची सुरुवात केली. मध्य प्रदेश, छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा कमलनाथ यांच्या खांद्यावर आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल काम करत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मुख्यमंत्र्यांची निवड राहुल यांनीच केली आहे. मात्र तरीही मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांचा उल्लेख करताना राहुल यांचा गोंधळ उडाला. हा व्हिडीओ सध्या भाजपाकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची नावंदेखील लक्षात न ठेवू शकणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान करायचं का, असा सवाल काहींनी सोशल मीडियावर उपस्थित केला. याआधी 2018 मध्ये राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी मोक्षगुंडम विश्वेशवरय्या यांचं नाव घेताना चुकले होते. त्यांनी अनेकदा विश्वेशवरय्या यांचं नाव उच्चारलं. राहुल गांधींसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेकदा भाषण करताना चुकले आहेत. 6 अब्ज मतदारांनी आपल्याला कौल दिल्याचं मोदी यांनी जानेवारी 2018 मध्ये दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत म्हटलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीChief Ministerमुख्यमंत्री