शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दहशतवाद्यांना भारतात कमकुवत सरकार हवंय- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 13:27 IST

सपा, बसपा, काँग्रेसवर मोदींचं शरसंधान

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील भाषणात दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 2014 च्या आधी भारतातली परिस्थिती श्रीलंकेसारखी होती. देशात अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोट व्हायचे. मात्र गेल्या पाच वर्षांत देशातली स्थिती बदलली. दहशतवादी हल्ले कमी झाले, असा दावा मोदींनी केला. ते उत्तर प्रदेशातल्या आंबेडकरनगरमध्ये जनसभेला संबोधित करत होते. आपल्या शेजारच्या देशात दहशतवादाचा कारखाना सुरू आहे. दहशतवाद्यांना आपल्या देशात कमकुवत सरकार हवं आहे. त्यामुळे तुमचं दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडेल, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीवर सडकून टीका केली. 'देशानं सपा-बसपा-काँग्रेसचा खरा चेहरा जाणून घेणं गरजेचं आहे. मायावतींनी केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. मात्र त्यांची तत्त्वं जपली नाहीत. समाजवादी पार्टीनं राम मनोहर लोहियांनी घालून दिलेला आदर्श मातीमोल केला,' अशा शब्दात मोदी महाआघाडीवर बरसले. मोदींनी महाआघाडीसोबतच काँग्रेसवरदेखील शरसंधान साधलं. 'काँग्रेसनं सत्तर वर्षे गरिबी हटवण्याची भाषा केली. मात्र कधीही मजुरांची काळजी केली नाही. त्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचा विचार केला. आमच्या सरकारनं मजुरांना निवृत्ती वेतन, विमा अशा सुविधा दिल्या,' असं मोदी म्हणाले. जनतेचं प्रेम पाहून विरोधकांचं बीपी वाढतं, असा टोलादेखील त्यांनी लगावला. मोदी आंबेडकर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019ambedkar-nagar-pcअंबेडकर नगरNarendra Modiनरेंद्र मोदीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी