शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

कंगना सोडून कोरोनाकडे लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 3:59 PM

देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कमी पडले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या वादावरून अख्खी सरकारी यंत्रणा कंगनाशी लढण्यासाठी उतरली आहे. आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरु आहे, असे म्हणत भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानेही तसे सांगितले आहे. मात्र कुठंतरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

याचबरोबर, जेवढ्या तप्तरतेने कंगनाची चौकशी करु, हे करु ते करु म्हणत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष कोरोनाकडे द्यायची गरज आहे. त्यापेक्षा 50 टक्के तरी क्षमता कोरोनावर खर्च करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कमी पडलेमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कमी पडले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  मराठा आरक्षणासंदर्भात ही स्थगिती तीन न्यायाधीशांच्या समितीने दिली आहे. आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून जोवर स्थगिती उठविली जात नाही, तोवर स्थगिती कायम राहील. प्रचंड स्टॅटर्जी तयार करुन कोर्टात जावे लागते. आम्ही तसे सतर्क राहायचो. मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी सांगितले की, राज्य सरकार कमी पडत आहे. हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही. आपण यात मार्ग काढला पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण कसे मिळेल, हे पाहायला हवे, असेही  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

MIDC जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागलाएकनाथ  खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी बातम्या...

- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता    

- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट    

- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण    

- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल     

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौत