शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

"लोकसंख्या नियंत्रणात ठेवा", आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 9:20 AM

Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या या विधानावरून सध्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जमिनीवरील अतिक्रमणासारख्या सामाजिक संकटावर तोडगा काढायचा असल्यास स्थलांतरीत मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल. (Himanta Biswa Sarma ) जर लोकसंख्येचा विस्फोट सुरू राहिला तर एके दिवशी कामाख्या मंदिराच्या जमिनीवरही कब्जा होईल, एवढेच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल, अशी चिंता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ("Keep population under control", Assam Chief Minister advises immigrant Muslims)

आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सरमा यांनी कार्यकाळाचा एक महिना पूर्ण केला आहे. त्या पार्श्वभूमीवप गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अतिक्रमण विरोधी अभियानांचा उल्लेख केला. तेव्हा ते म्हणाले की, आसाममध्ये अतिक्रमण विरोधी अभियान सुरू आहे. जे लोक विस्थापित झाले आहेत. ते अप्रवासी (स्थलांतरीर) मुस्लिम समुदायाचे आहेत. 

आसामच्या मध्य आणि खालच्या भागामध्ये राहणारे बंगाली भाषिक मुस्लिम हे बांगालदेशमधून आलेले स्थलांतरीत असल्याचे मानले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आसाममधील मूळ समुदायांना त्यांच्यापासून वाचवण्याची गरज असल्याची वातावरणनिर्मिती केली होती. आसामची एकूण लोकसंख्या ३.१२ कोटी असून या लोकसंख्येमध्ये तब्बल ३१ टक्के लोक हे स्थलांतरीत मुस्लिम आहेत. आसाममधील १२६ पैकी ३५ मतदारसंघात त्यांची मते निर्णायक ठरतात. आसामचे मुख्यमंत्री सरमान यांनी सांगितले की, आम्ही गेल्या विधानसभा अधिवेशनात लोकसंख्येबाबतचे धोरण लागू केले आङे. आम्ही खासकरून अल्पसंख्याक मुस्लिम समुदायासोबत मिळून काम करू इच्छित आहोत जेणेकरून वाढत्या लोकसंख्येचा बोजा कमी करता येईल. लोकसंख्येचा विस्फोट हा गरिबी आणि अतिक्रमणासारख्या सामाजिक कृप्रथांचे मूळ आहे. जंगल,मंदिरे आणि वैष्णव मठांवर अतिक्रमण करण्याची परवानगी कुणालाही देता येणार नाही. हे सर्व वाढत्या लोकसंख्येमुळे होत आहे.  जर आपण लोकसंख्या नियंत्रित केले तर अनेक सामाजिक समस्यांवर तोडगा काढता येऊ शकेल. जर स्थलांतरित मुस्लिमांनी एक सभ्य कुटुंब नियोजनाचा स्वीकार केला, तर ही समस्या काही प्रमाणात सुटेल. या मुद्द्यावर मी बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफ आणि एएएमएसयू या पक्षांसोबत मिळून काम करू इच्छितो.  दरम्यान एआययूडीएफचे सरचिटणीस अनिमूल इस्लाम यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान राजकीय हेतूने प्रेरित आणि एका समुदायाविरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाMuslimमुस्लीमPoliticsराजकारण