शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

'१३ एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल'; अशांत भाजपामुळे येडीयुराप्पांचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 9:27 AM

Karnataka Politics : विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली.

नेहमीच राजकीय दृष्ट्या अशांत राहिलेल्या कर्नाटकात काँग्रेस-निजदचे सरकार पाडून भाजपाने सत्ता हिसकावली असली तरीही भाजपात सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळविस्तारावरून मुख्यमंत्री येडीयुराप्पांना आमदारांची प्रचंड नाराजी झेलावी लागत आहे. आता एक आमदाराने 13 एप्रिलची तारीख जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली. आता पुन्हा कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त करताय येडीयुराप्पांनी त्यांना दिल्ली हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली त्यांची नावे दिल्लीत ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगतानाच एक मंत्रीपद रिक्त असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, यानंतर भाजपाच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरून गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

भाजपाच्य़ा आमदारांचे आरोपमंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचे आमदार बीपी यतनाल यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री येडीयुराप्पांना काही आमदार या सीडीवरून गेल्या तीन महिन्यांपासून ब्लॅकमेल करत आहेत. यापैकी एकाला राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्री बनविण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यानंतर पुन्हा ती सीडी चर्चेत आली आहे. आता याच बसनगौडा पाटील यतनाल यतनाल (BJP MLA Basanagouda Patil Yatnal) यांनी पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. 

कर्नाटकमध्ये उगडी सणापासून नवीन वर्ष साजरे केले जाते. हे वर्ष यंदा 13 एप्रिलपासून सुरु होत आहे. या दिवसाला कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य पाटील यांनी केले. ते विजयपुरामध्ये बोलत होते. मला हात पसरून मंत्रीपद मागायची गरज राहणार नाही. कारण आपला माणूस मुख्यमंत्री होणार आहे. तोच मला मंत्रीपद देणार आहे. हा नेता उत्तर कर्नाटकातील असेल, वाट पहा आणि बघा, असे ते म्हणाले.  

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा