...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:23 PM2020-08-18T19:23:16+5:302020-08-18T19:24:48+5:30

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून लावून धरण्यात आली आहे.

If Central wants CBI should investigate in Sushant Singh Rajput Case Says minister Aslam Shaikh | ...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका

...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका

Next
ठळक मुद्देसुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यावरुन सरकारमध्ये मतभेद केंद्राला वाटत असेल सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी करु शकतं. काँग्रेस मंंत्री अस्लम शेख यांचं विधान

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात केंद्राला सीबीआय चौकशी करायची असेल तर करावी असं वक्तव्य राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याने केले आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीवरुन राज्य सरकारच्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सीबीआय चौकशीला पाठिंबा दिल्याचं त्यांच्या विधानावरुन दिसत आहे.

या प्रकरणी मंत्री अस्लम शेख म्हणाले की, सुशांत प्रकरण मुंबई पोलीस चांगल्यारितीने तपास करत आहे. पण केंद्राला वाटत असेल यामध्ये आणखी तपासाची गरज आहे तर त्यांनी चौकशी करावी. ही घटना मुंबईत घडली आहे. काही लोकांनी या प्रकरणात मीडियात नावं यावी यासाठी विधाने करत आहे. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद आहे त्यामुळे या वादात काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांनी तपास केला आहे तरी केंद्राला वाटत असेल सीबीआय चौकशी करावी तर करु शकतात असं ते म्हणाले.

तसेच तपासाला ६० दिवस असो, १२० दिवस झाले, केंद्र सरकारला वाटत असेल तर त्यांनी चौकशी करावी असं मत अस्लम शेख यांनी मांडले आहे. सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण असताना राज्य सरकार सीबीआयकडे हे प्रकरण सोपवू नये यासाठी विरोध करत आहे. अशा परिस्थितीत जर काँग्रेसमधील मंत्री सीबीआय चौकशीच्या मागणीला पाठिंबा देत असतील तर नक्कीच हे महत्त्वपूर्ण विधान आहे. (Sushant Singh Rajput Death)

शिवसेनेची भूमिका काय?

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं होतं. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं असं राऊत म्हणाले होते.

दरम्यान, सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात संजय राऊतांनी विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यानंतर, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली. तसेच, माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा असं आवाहनही केलं होतं. (Sushant Singh Rajput Death)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून लावून धरण्यात आली आहे. अनेक कलाकारांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. तर सीबीआय चौकशीच्या मागणीवरुनच पवार कुटुंबामधील मतभेद समोर आले होते. शरद पवारांनी मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगत पार्थ पवाराच्या मागणीला फटकारलं होतं. मात्र त्यांनी हे विधानही केले होते की, ज्यांना सीबीआय चौकशी मागणी करायची आहे, करु शकतात त्याला आमचा विरोध नाही असंही मत पवारांकडून व्यक्त केलं होतं. त्यामुळे सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Web Title: If Central wants CBI should investigate in Sushant Singh Rajput Case Says minister Aslam Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.