"I don't know what political intelligence Ajit Pawar works with Says; BJP Pankaja Munde | “अजित पवार कोणत्या राजकीय बुद्धीनं काम करतात ते कळत नाही”; भाजपा नेत्याची बोचरी टीका

“अजित पवार कोणत्या राजकीय बुद्धीनं काम करतात ते कळत नाही”; भाजपा नेत्याची बोचरी टीका

ठळक मुद्देते कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाहीभाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीत वैधानिक विकास मंडळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं, यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांबाबत विधान केल्यानं सभागृहात गोंधळ माजला, विरोधकांनी अजित पवारांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला.(BJP Pankaja Munde Target DCM Ajit Pawar)

मराठवाड्याचा विकास आणि ‘त्या’ १२ आमदारांचा संबंध काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान दुर्दैवी आहे, ते कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे. सभागृहात वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्तीवरून विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले, तेव्हा राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं घोषित करतील त्यावेळी विकास मंडळाची घोषणा करू असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी(Ajit Pawar) केले होते, त्यावरून पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

काय होता वाद?

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? इतके दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी केली. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधलं. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असं अजित पवार म्हणाले.

अजितदादांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

दादांच्या पोटातलं आता ओठांवर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस अजित पवारांवर बरसले. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपली

Web Title: "I don't know what political intelligence Ajit Pawar works with Says; BJP Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.