अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

By प्रविण मरगळे | Published: February 28, 2021 09:42 PM2021-02-28T21:42:06+5:302021-02-28T21:44:30+5:30

Ajit Pawar Challenge to BJP to Bring No Cofidence motion in Assembly: काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे

Ajit Pawar challenge to BJP Devendra Fadnavis to bring no-confidence motion in Assembly | अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नाहीयंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे, अधिवेशनात विरोधकांनी ठाकरे सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती आखली आहे, यात धनंजय मुंडे, संजय राठोड, वाढीव वीज बिलसारखे अनेक प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, यातच विधानसभा अध्यक्षपदाचाही विषयावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे.(DY CM Ajit Pawar Open Challenge to BJP Devendra Fadnavis)  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) सरकारवर टीका केली होती, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

फडणवीस म्हणाले की, सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही, त्यावर पत्रकारांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा प्रश्न विचारला, तेव्हा अजितदादा म्हणाले की, जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि आमच्यासोबत किती...अजित पवारांच्या(Ajit Pawar) या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले.

संजय राठोड राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा

सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, वर्षभरापासून आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, अशा घटना घडत आहेत असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

..अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

तसेच प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, इतके दिवस का लावले असा विचार करत असाल तर ज्या क्षणी ही घटना घडली, तेव्हा आमच्या सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास कालबद्ध ठरवा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, परंतु हे सगळं सुरू असताना आदळआपट करून तपास यंत्रणेवर दबाव टाकणं हे योग्य नाही, तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातोय, महाराष्ट्र पोलिसांवर विरोधकांचा अविश्वास आहे. पोलीस यंत्रणांवर अविश्वास दाखवत असाल तर आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar challenge to BJP Devendra Fadnavis to bring no-confidence motion in Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.