शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

इलक्सन आली, दिवाळी झाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:50 AM

ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत

ठाणे : चलो इलक्सन आया है, ५०० रुपैय्या की बोली है’ असे म्हणत डोंबिवलीतील इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर तसेच ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत. दिवसभरात टिकल्या, पापड करून जेवढी कमाई होत नाही, ती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या रॅली, सभा, भाषणांना गर्दी करून पाच तासांत मिळत असल्याने ‘इलक्सन के दिन है’ म्हणत अन्य कामांच्या ठिकाणी सुटी घेण्याची मानसिक तयारी महिलांनी केली आहे. बिर्याणी, चहा, नाश्ता, पाणी आणि येण्याजाण्यासाठी गाडीही असल्याने भाड्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जणू दिवाळीच आहे.विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे पदाधिकारी किंवा ज्यांनी रॅलीमध्ये गर्दी, सभा भरवण्याची जबाबदारी घेतलेली असते, ते कॉर्पोरेट इव्हेंट करणाºया संस्थांचे प्रतिनिधी येतात आणि व्यवहार करून जातात. १०० ते ५०० महिला आणि त्यापुढे पुरुष, युवा अशी गर्दी दिसून येण्यासाठी वेगवेगळे बोलीचे प्रमाण ठरलेले आहे. अगदीच छोटा पक्ष असेल तर ३००, ४०० रुपये घेत महिला प्रचारात सहभागी होतात. परंतु, मोठ्या पक्षांकडून मात्र आणि ज्यांची चलती आहे, अशांकडून मात्र ५०० रुपये प्रति महिला, पुरुषांना देण्याची बोली पक्की झाल्याशिवाय कुणीही जात नाही. एकदा बोली झाली की, मग ती तारीख अन्य कुणालाही दिली जात नाही. तसेच बोली झाली की, लगेच सर्व निधी तोही रोखीच्या स्वरूपात द्यावा लागतो. संपर्कासाठी चार, पाच मोबाइल दिले जातात. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी एकत्र येण्याचे ठिकाण, तेथे जाण्यासाठी वाहनांची सोय, पाण्यापासून चहा, नाश्ता, जेवणाचे पॅकेट्स असे सगळे ठरलेले असते, अशी माहिती रागिणी गौतम, संगीता जैस्वाल, रुबिना शेख, मुमताज शेख आदी महिला प्रतिनिधींनी दिली. या महिलांना गळ्यात घालायला उपरणे, टोप्या तसेच पक्षांचे झेंडे, निवडणूक चिन्हे हेही दिले जाते. प्रचारात सहभागी होत असल्याने रोजगार मिळतो. दिवस ढकलला जातो. महागाईच्या दिवसात कौटुंबिक खर्च भागवणे कठीण होते. त्यामुळे दिवस भरण्याची आणि अर्थार्जन करण्यासाठी जी संधी मिळते, ती न सोडण्याकडेच सगळ्यांचा कल असतो.>भाडोत्री कार्यकर्त्यांना रोख मजुरीधुणीभांडी करणाºया, वाहने धुण्यासाठी तसेच अन्य किरकोळ कामे करणाºया तळागाळातील महिला, पुरुषांचा वापर प्रचारात गर्दी करण्यासाठी केला जातो. या कामासाठी त्यांना मुख्यत्वे रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे त्यांना नोटाबंदीच्या काळात बसलेला फटका भरून काढण्याची संधी निवडणुकीमुळे चालून आली आहे. बहुतांश उच्च मध्यमवर्गीयांसह सगळ्यांनाच धुणीभांडी करण्यासह वाहने धुण्यासाठी, सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी मनुष्यबळ लागतेच. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ही कामे घरी केली जातात. त्यामुळे आता निवडणूक काळात हा कामगार वर्ग बरेचदा त्यांच्या कामावर नसल्याचे दिसते.तुमची कामवाली किंवा गाडी धुणारा दोन-चार दिवस दिसला नाही, तर त्याचा अर्थ तो या प्रचारफेरीत सामील झाला आहे. अलीकडे सभा, रॅलींचे इव्हेंट कंपन्यांना कंत्राट दिले जाते. त्यामुळे या व्यवसायातील छोट्या व्यापाऱ्यांवर संक्रांत आली आहे. साउंड सिस्टीम कालबाह्य झाली असून त्यासाठी केलेला खर्च अडकून पडला आहे.रिक्षांना झेंडे लावणे, हुडवर जाहिरात करणे, अशा पद्धतीनेही प्रचार केला जातो. अनेकदा पक्षप्रेमापोटी वाहनांवर झेंडे लावले जातात. पण, त्यातूनही दिवसाला १०० ते २०० रुपये मिळत असल्याने अथवा इंधन भरून दिले जात असल्याने ती संधी तरी का सोडावी, असा काही रिक्षाचालकांचा कल दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे