शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हीना गावित यांचा राष्ट्रीय विक्रम; ५४ वर्षांनी मोठ्यास केले पराभूत

By प्रेमदास राठोड | Published: April 15, 2019 5:32 AM

२००९ मध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ४८ खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षे होते, गेल्या वेळी हे वयोमान दोन वर्षांनी कमी म्हणजे सरासरी ५२ वर्षे होते.

- प्रेमदास राठोड२००९ मध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ४८ खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षे होते, गेल्या वेळी हे वयोमान दोन वर्षांनी कमी म्हणजे सरासरी ५२ वर्षे होते. देशात मात्र उलट स्थिती होती. २००९ मध्ये देशात विजयी झालेल्या खासदारांचे सरासरी वयोमान ५३ वर्षे होते, ते गेल्या निवडणुकीत एका वर्षाने वाढून ५४ वर्षे झाले.२००८च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेसाठी दोन सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यात वयाने ५४ वर्षे ज्येष्ठ उमेदवारास पराभूत करण्याचा राष्ट्रीय विक्रम २०१४ साली नंदूरबारमध्ये डॉ. हीना गावित (भाजप) यांनी केला. त्यावेळी २६ वर्षीय डॉ. हीना यांनी ८० वर्षीय माणिकराव गावित (काँग्रेस) यांचा पराभव केला. या (२०१९) निवडणुकीतही हे दोघे नंदूरबारमध्ये उतरले आहेत. हीना यांच्यापूर्वी २००९ साली म.प्र.च्या मंदसौरमध्ये ३६ वर्षीय मीनाक्षी नटराजन (काँग्रेस) यांनी वयाने ४४ वर्षे मोठे डॉ. लक्ष्मीनारायण पांडेय (भाजप) यांना पराभूत केले होते. वयोवृद्धाने त्याच्याहून ४९ वर्षे लहान उमेदवारास हरविण्याचा विक्रम २०१४ साली उ.प्र.च्या कैरानामध्ये भाजपचे वयोवृद्ध उमेदवार हुकुम सिंग यांनी केला. त्यावेळी ७५ वर्षीय हुकुम सिंग (भाजप) यांनी २६ वर्षीय नाहीद हसन (सपा) यांना २.३६ लाख मतांनी पराभूत केले होते. २००९ मध्ये आसामच्या जोरहटमध्ये ७७ वर्षीय कृष्णा बिजॉय (काँग्रेस) यांनी वयाने ४३ वर्षे लहान उमेदवार कामाख्य तसा (भाजप) यांना हरविले होते.गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशात विजयी १,०८६ उमेदवारांपैकी ५४६ जणांनी वयाने ज्येष्ठांचा पराभव केला, तर ५२२ ज्येष्ठांनी वयाने लहान उमेदवारांना पराभूत केले. १८ ठिकाणी विजयी व पराभूत उमेदवार दोघेही समान वयाचे होते. ज्येष्ठांवर मात करणाऱ्यांचे प्रमाण देशात जास्त असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण समसमान आहे. महाराष्ट्रात वयाने मोठ्या उमेदवारांवर आणि वयाने लहान उमेदवारांवर विजय मिळविणाऱ्यांची संख्या समसमान म्हणजे ४७-४७ आहे. उर्वरित २ ठिकाणी विजयी व पराभूत उमेदवार समान वयाचे होते.

डॉ. हीना गावित यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात २०१४च्या निवडणुकीत राजू शेट्टी (हातकणंगले) आणि राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण-मध्य) या दोघांनी वयाने खूप ज्येष्ठ उमेदवाराचा पराभव केला. ४६ वर्षीय राजू शेट्टी यांनी ३६ वर्षांनी मोठे कलप्पा आवाडे (वय त्यावेळी ८२) यांचा तर ४१ वर्षीय राहुल शेवाळे यांनी वयाने ३३ वर्षांनी मोठे एकनाथ गायकवाड (वय त्यावेळी ७४) यांचा पराभव केला होता. शेवाळे व गायकवाड यंदा पुन्हा मुंबई दक्षिण-मध्ये समोरासमोर आहेत. २००९च्या निवडणुकीत वयाने ३० वर्षे ज्येष्ठ राम नाईक (वय त्यावेळी ७४) यांना संजय निरुपम यांनी मुंबईत उत्तरमध्ये पराभूत केले. गेल्या वेळी शिवसेनेच्या भावना गवळी (यवतमाळ), डॉ. सुनील गायकवाड (लातूर) आणि शरद बनसोडे (सोलापूर) या तिघांनी वयाने २५ वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ नेत्यांचा पराभव केला होता.अकोल्यात गेल्या वेळी ५५ वर्षीय संजय धोत्रे यांनी त्यांच्याच वयाचे हिदायत पटेल यांचा आणि बारामतीत ४४ वर्षीय सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याच वयाचे महादेव जानकर यांना पराभूत केले होते. अकोल्यात पुन्हा समवयस्क धोत्रे-पटेल हे दोघे आणि त्यांच्यापेक्षा ४ वर्षांनी मोठे प्रकाश आंबेडकर यांच्यात सामना आहे. गेल्या वेळी देशातून २६ वर्षे वयाचे ५ जण लोकसभेत पोहोचले, त्यात महराष्ट्रातील डॉ. हीना गावित (नंदूरबार) आणि रक्षा खडसे (रावेर) या दोघींचा समावेश होता. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये गेल्या वेळी बाजी मारलेले गजानन कीर्तिकर (वय ७०) हे राज्यातील सर्वांत ज्येष्ठ विजयी उमेदवार होते. २००९मध्ये बाजी मारलेले डॉ. नीलेश राणे (वय २८) हे त्यावेळी सर्वांत तरुण तर माणिकराव गावित (वय त्यावेळी ७५) हे सर्वांत ज्येष्ठ उमेदवार होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nandurbar-pcनंदुरबार