शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape :"स्मृती इराणी योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट द्यायला कधी जाणार?"

By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 17:14 IST

Hathras Gangrape news : भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तावित हाथरस दौऱ्यावर टीका केली होती.

ठळक मुद्देराहुल गांधींच्या हाथरस दौऱ्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार स्मृती इराणी योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट द्यायला कधी जाणार, एवढं सांगावंकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला सवाल 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारावरून संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहेत. तसेच या प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या हाथरस दौऱ्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. स्मृती इराणी योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट द्यायला कधी जाणार, एवढं सांगावं, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला आहे.भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तावित हाथरस दौऱ्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांचा हाथरस दौरा हा न्यायासाठी नव्हे तर, राजकीय हेतूने प्रेरित आहे. जनतेला काँग्रेसचे हे हातखंडे माहित आहेत, त्यामुळेच २०१९ मध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळावा, हे जनतेने ठरवले होते, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.स्मृती इराणी यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. सुरजेवाला आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, स्मृती इराणी यांनी केवळ एवढंच सांगावं की, त्या योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट देण्यासाठी कधी जाणार आहेत.तत्पूर्वी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को चाचणी करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावरही रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली होती. हाथरसरमधील पीडित कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय हा योगी आदित्यनाथ सरकारच्या वेडेपणाचा पुरावा आहे, पीडित तरुणीवर ना उपचार झाले. ना तिला न्याय मिळाला, रात्री अडीच वाजता पीडित तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना धमकी देण्यात आली. त्यांचा मोबाइलसुद्धा हिसकावून घेण्यात आला. गावात प्रसारमाध्यमांनाही जाऊ दिले नाही, अधर्मी योगींनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली होती.

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारcongressकाँग्रेसBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश