शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

Devendra Fadanvis: '...म्हणून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सरकारला फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:21 IST

Devendra Fadnvis on OBC Political Reservation: सगळी माहिती जाहीर होताच सरकार अडचणीत येणार, हे लक्षात आल्यामुळे आमच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आमची लढाई सुरूच राहणार

पुणे: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळादरम्यान धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे आरोपही करण्यात आले. त्या सर्व गोंधळानंतर भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला टीकस्त्र सोडले आहे. 

किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले... 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. त्या टीकेवर पलटवार करताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल बोलत असावेत. कारण, इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात आहे, भाजपल नाही.  

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणreservationआरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणPuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस