शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"अजित पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:44 IST

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रस आणि पवार कुटुंबीयांना टीकेचे लक्ष्य करणारे भाजपाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

पंढरपूर - विविध विषयांवरून राष्ट्रवादी काँग्रस आणि पवार कुटुंबीयांना टीकेचे लक्ष्य करणारे भाजपाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नत्ती आरक्षण उपसमितीचे प्रमुख बनवणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे आहे, अशी घणाघाती टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.  (Gopichand Padalkar Criticize Ajit Pawar)

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान, यासंदर्भातील मागासवर्गीय नोकरी पदोन्नत्ती आरक्षण उपसमितीचे प्रमुखपद अजित पवारांकडे सोपवण्याच्या निर्णयावर गोपिचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, हे सरकार आल्यापासून या सरकारने आरक्षणाचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. मग ते मराठा आरक्षण असो वा आता मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आऱक्षण रद्द करण्याचा निर्णय असो, सगळा सावळागोंधळ सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेवरून नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद झाल्याचे वृत्त माध्यमांमधून झळकले होते. एकीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे बैठकीत काही निर्णय झाला तर त्याची माहिती माध्यमांसमोर देतात. मात्र अजित पवार यांनी ही बैठक झाल्यानंतर भाष्य केलेले नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, याबाबत स्पष्टीकरण द्या. तर दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे की मागासवर्गीय पदोन्नतील आरक्षणाचा विषय संपवला आहे. तर उच्च न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिल्याचे वृत्त आले आहे. मात्र या ऑर्डरची कॉपी मिळालेली नाही. त्यामुळे पदोन्नती आरक्षणाबाबत नेमकं काय घडलंय याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे.  

दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे. उपसमितीला न विचारताच हा ७ मे रोजीचा हा जीआर कसा रद्द करण्यात आला, सामान्य प्रशासन विभागाने परस्पर निर्णय कसा घेतला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. मागासवर्गीयांवर अन्याय करण्याची माझीही भूमिका नाही, असे पवार यांनी राऊत यांना सुनावल्याचे समजते. राऊत आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी केली. त्यावर, हा सर्व विषय विधि व न्याय विभागाकडे पाठवून अभिप्राय मागवायचा व नंतर पुन्हा उपसमितीची बैठक घ्यायची, असा निर्णय झाला.बुधवारच्या बैठकीच्या निमित्ताने दावे-प्रतिदावेही झाले. राऊत यांच्या मागणीनंतर जीआरची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय झाला, असे आधी प्रसिद्धी माध्यमांना कळविले गेले. नंतर मात्र, या जीआरला स्थगिती देण्याची मागणी राऊत यांनी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये जीआरला स्थगिती दिल्याचा उल्लेख नव्हता. त्यातच जीआरला स्थगिती दिल्याच्या बातम्या पसरविल्या गेल्याबद्दल अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती पसरविली गेली. राज्य शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना १०० टक्के पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसारच द्यायचा, असा जीआर ७ मे रोजी काढण्यात आला होता. या जीआरमुळे अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्गांसाठी २० एप्रिल रोजीच्या जीआरनुसार राखीव ठेवलेले ३३ टक्के आरक्षण रद्द झाले. त्यामुळे मागासवर्गीस संघटना, नेते आक्रमक झाले. ७ मे रोजीचा जीआर रद्द करण्याची मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरAjit Pawarअजित पवारreservationआरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण