शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

"दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:29 PM

Congress Sachin Sawant And Modi Government : शिवजयंतीवरून सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - कोरोना सध्या नियंत्रणात असला तरी राज्य असो वा केंद्र सरकार विशेष खबरदारी घेत आहे, १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातशिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, तत्पूर्वी ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवजयंतीवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही" असं म्हणत सावंत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदीजींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये" असं म्हटलं आहे. तसेच "शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच मविआ सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही" असं म्हणत टोला लगावला आहे. 

"१० ऐवजी १०० वाचावे"; ठाकरे सरकारनं शिवजयंतीच्या परिपत्रकातील 'ती' चूक सुधारली!

ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र या मार्गदर्शक सूचना देत असताना ठाकरे सरकारला एका चुकीचा फटका बसला आहे, शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण्यात आलं होतं, परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून टीका होत असताना पुन्हा यातील चूक सुधारत गृह विभागाने दुसरं शुद्धिपत्रक काढलं, यात म्हटलं आहे की, शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात येत असून आता १० ऐवजी १०० असे वाचावे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना १०० जणांच्या उपस्थितीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शिवजयंती हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजयंती साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रShivjayantiशिवजयंतीcongressकाँग्रेसBJPभाजपा