Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 02:58 PM2021-07-10T14:58:34+5:302021-07-10T15:03:57+5:30

Cabinet Expansion: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet | Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

Next
ठळक मुद्देकेंद्रीय कॅबिनेट विस्तारावर पुन्हा एकदा टीकाभाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच कॅबिनेट मंत्रिपदमाजी IAS अधिकाऱ्याची जोरदार टीका

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या १२ मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. मात्र, यावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले, अशी टीका एका माजी IAS अधिकाऱ्याने मोदी सरकारवर केली आहे. (former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet)

माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी एक ट्विट करत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. यामध्ये भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनाच आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे सूर्यप्रताप सिंह यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेकांनी विविध स्तरांतून टीका केली आहे. तर, काही दिग्गज मंत्र्यांचे घेतलेले राजीनामे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले. 

“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल

मास्टरस्ट्रोक

ज्या नारायण राणेंवर भाजपने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला होता. तेच आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत आणि MSME सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. मास्टरस्ट्रोक, असे ट्विट सूर्यप्रताप सिंह यांनी केले आहे. 

नारायण राणे कॅबिनेट मंत्री

मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर यावरून महाराष्ट्रातही अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना नेत्यांनी यासंदर्भात नारायण राणे, भाजप आणि मोदी सरकारवर अप्रत्यक्ष किंवा थेट टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. 

“डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीही खांदेपालटावर टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली. 
 

Web Title: former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.