अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 11:59 AM2021-02-21T11:59:11+5:302021-02-21T12:03:18+5:30

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्य

up former cm akhilesh yadav criticize yogi adityanath and modi government over farmers issue | अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

googlenewsNext
ठळक मुद्देपुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्यतीन कृषी कायदे उद्योग घराण्यांच्या वर्चस्वासाठीच. अखिलेश यादव यांचा आरोप

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नसून ते दुसऱ्या प्रदेशातून आले आहेत. परंतु येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजे, असं ते म्हणाले. 
पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते दुसऱ्या प्रदेशातील आहेत हे सांगण्यामागील कारण काय याबाबत मात्र त्यांनी भाष्य केलं नाही. उत्तर प्रदेशातील जनता भाजप सरकारमुळे त्रस्त असून पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

"मुख्यमंत्री हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नाहीत. ते दुसऱ्या प्रदेशातून या ठिकाणी आले आहेत. येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. अन्नदात्यांचा आनंद दलालांच्या पचनी पडत नाही, या योगींच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. तसंच इतकं मोठं खोटं सदनात कोणी कसं बोलू शकतं? असा सवालही त्यांनी केला.

खोटा दावा केला 

गोरखपुर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, संतकबीर नगर, बस्ती, गोंडा आणि फैजाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सरकारनं एमएसपी दिलं आहे का? त्यांना धान्याची किंमत काय दिली आहे असा प्रश्नही अखिलेख यादव यांनी केला. ऊस शेतकऱ्यांना सर्वाधिक देणी ही भाजप सरकारनं दिली असा खोटा दावा या सरकारनं केला. या सराकारनं अर्थव्यस्था खराब केली. लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. कृषी क्षेत्रावरही काही उद्योग घराण्यांचं वर्चस्व प्रस्थापित होईल यासाठीच हे तीन कृषी कायदे आणल्याचा आरोप त्यांनी केला. 

Web Title: up former cm akhilesh yadav criticize yogi adityanath and modi government over farmers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.