शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 1:56 PM

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे; भाजप, महाविकास आघाडीत जुंपली

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे. 'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सरकारमधील नेत्यांनी केला. यानंतर आता भाजप नेत्यांशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.मोठी बातमी! प्रताप सरनाईकांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यातआमदार प्रताप सरनाईक घरी नसताना धाडी टाकण्यात कसली मर्दानगी?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत कार्यालयात नसताना, ती मुंबईबाहेर असताना तिचं कार्यालय बुलडोझर लावून पाडण्यात कोणती मर्दानगी होती?, असा प्रतिसवाल दरेकरांनी केला आहे. मर्दानगीच्या व्याख्या सोयीनुसार बदलतात का?, असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी राऊत यांना विचारला.'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रियाईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. राऊतांच्या या आव्हानाला दरेकरांना प्रतिआव्हान दिलं आहे. 'इतका वेळ १०० जणांची यादी राऊत यांनी कशासाठी स्वत: जवळ ठेवली? त्यांनी ती यादी लगेच ईडीला द्यावी. ईडी स्वायत्त यंत्रणा आहे. त्यामुळे राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून उगाच मोदी सरकारवर टीका करू नये,' असं दरेकर म्हणाले....म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाणआम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमककितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचं पथक; सेनेचे इतरही नेते रडारवर?प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना