"नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 15:26 IST2021-02-11T15:26:21+5:302021-02-11T15:26:45+5:30

Parinay Fuke answer to Nana Patole : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत.

Dr. Parinay Fuke Says, Nana Patole haunted by Modi hatred, his criticism is Examples of perverted attitudes | "नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..."

"नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..."

नागपूर - काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. पटोले यांच्या टीकेला आता भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाचे विदर्भातील नेते डॉ. परिणय फुके यांनी नाना पटोले हे मोदी द्वेषाने पछाडलेले असल्याची टीका केली आहे.

परिणय फुके यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून पटोले यांच्या विधानाचा समाचार घेतला ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात केलेली टीका ही पटोले यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे. पटोले यांना मोदी द्वेषाने पछाडले आहे. नरेंद्र मोदी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी पटोले यांनी आधी आपले घर दुरुस्त करावे. त्यांच्या निवडीमुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांनी समजूत घालावी, असा टोला फुके यांनी लगावला. 



आक्रस्ताळेपणा आणि विरोधकांना त्रास देणे हा पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी हे काम असेच प्रामाणिकपणे करावे. आम्ही मात्र आमच्या लोकसेवेचे कार्य असेच अखंडितपणे सुरू ठेऊ. पटोले यांना आमच्या शुभेच्छा, असा चिमटाही फुके यांनी या पोस्टमधून काढला.



पटोले म्हणाले होते, नटसम्राट व्हायचं असेल तर मोदींनी सिनेमात जावं...
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं "असे म्हटले होते.

Web Title: Dr. Parinay Fuke Says, Nana Patole haunted by Modi hatred, his criticism is Examples of perverted attitudes