कोरोना संकट काळात राजकारण करु नका; एकनाथ शिंदेंचा रामदास आठवलेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:01 PM2020-08-13T20:01:03+5:302020-08-13T20:09:53+5:30

कल्याणमध्ये एमसीएचआय क्रेडिया यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन झिरो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Don't do politics during the Corona crisis; Eknath Shinde's advice to Ramdas Athavale | कोरोना संकट काळात राजकारण करु नका; एकनाथ शिंदेंचा रामदास आठवलेंना सल्ला

कोरोना संकट काळात राजकारण करु नका; एकनाथ शिंदेंचा रामदास आठवलेंना सल्ला

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गणपती विसजर्नानंतर विसजर्न होईल अशी टीका केली होती.

कल्याण : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गणपती विसजर्नानंतर विसजर्न होईल अशी टीका केली होती. या टिकेला प्रतिउत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे राजकारण कोणीही करु नये, अशा प्रकारचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करु, असा सल्ला रामदास आठवले यांना दिला आहे.

कल्याणमध्ये एमसीएचआय क्रेडिया यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन झिरो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी उपरोक्त सल्ला रामदास आठवले यांना दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व पार्थ पवार यांच्यातील वादाचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होईल का असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, पवारसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. सध्या राजकारण महत्वाचे नाही. सध्या सरकारचा फोकस कोविडवर आहे. लोकांचे आरोग्य वाचविणो हे महत्वाचे आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्याठिकाणी कोरोनाची स्थिती काय आहे, अशी विचारणा त्यांना केली असता सांगितले की, त्याठिकाणी सुरुवातीला कोरोना रुग्ण नव्हते. बाहेरुन आलेल्या लोकांमुळे त्याठिकाणी काही जणांना लागण झाली. त्याठिकाणी कोरोना रुग्ण आहेत. मात्र कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. ही चांगली बाब आहे. पोलीस, एसआरपीएफ, आरपीएफ, सीआरपीएफ यांच्या अधिकारी व जवानांच्या मी भेटी घेतल्या आहेत.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत

शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया    

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका    

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी    

Web Title: Don't do politics during the Corona crisis; Eknath Shinde's advice to Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.