Several important decisions in the state cabinet meeting; Relatives of those who sacrificed in the Maratha movement will get jobs | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज (12 ऑगस्ट) महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 व्यक्तींच्या नातेवाईकांस एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

•  सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षी एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणाच्या परिणामी बाधीत झालेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाचे भरणा केलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती शासनामार्फत करण्याचा निर्णय. 

•  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय. 

•  मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय . म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

•  महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्याकरिता अधिनियमात दुरुस्ती करण्यास मान्यता.

• अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ

• शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्सचा विद्यावेतनात वाढ

• मुचकुंदी लघू पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Several important decisions in the state cabinet meeting; Relatives of those who sacrificed in the Maratha movement will get jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.