शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 13:29 IST

Pooja Chavan Suicide Case: अखेर १५ दिवसांनंतर संजय राठोड सर्वांसमोर; पोहरादेवीत समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन

यवतमाळ: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case:) चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) अखेर १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. गेल्या १५ दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत.पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेशआज सकाळी संजय राठोड बंजारा समाजाचं महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. राठोड मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्या. त्यावेळीही त्यांच्या पत्नी सोबत होत्या. या अडचणीच्या काळात आपलं कुटुंब पाठिशी असल्याचा स्पष्ट संदेश यातून राठोड यांनी दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष लागलं आहे.“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”राठोड यांचं शक्तिप्रदर्शन; पक्ष नेतृत्त्वाला संदेश?संजय राठोड गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होते. आज ते समोर आले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवीला गर्दी केली. पोहरागडावर राठोड यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनी राठोड याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 'कोण आला रे कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला', अशा स्वरूपाच्या घोषणा राठोड यांच्या समर्थकांनी दिल्या. माझा समाज माझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असा स्पष्ट संदेश राठोड यांनी त्यांचे पक्षप्रमुख आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) दिल्याचं बोललं जात आहे. पोहरादेवीला शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.शिवसेनेत दोन सूर; धनंजय मुंडेंचा दाखल; पण...राठोड यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जावा, असा एक सूर शिवसेनेत आहे. तर राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं असा एक मतप्रवाह असलेला गटदेखील पक्षात आहे. या गटानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा दाखला दिला. मुंडे यांच्यावर आरोप झाले, तेव्हा पक्ष त्यांच्यामागे भक्कमपणे उभा होता, असा संदर्भ या गटाकडून देण्यात येतो. पण मुंडेंवर आरोप झाले तेव्हा ते माध्यमांना थेट सामोरे गेले होते. ते बेपत्ता झाले नव्हते, असं एका गटाला वाटतं.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडे