शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:36 IST

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी केली. त्या पत्रपरिषदेत बोलत होत्या.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असेल तर वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. सध्या राजकीय नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने यासाठी एक वेगळी यंत्रणा अशा प्रकरणाच्या तपासणीसाठी असावी का असेही वाटू लागले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाखाली होऊ नये, सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

पूजा प्रकणातील क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणे यंत्रणेचे काम आहे. या प्रकरणावरून कोणतेही राजकारण होता कामा नये, राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असे नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे