शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

"धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवले नाहीत, ही मर्दपणाची बाब"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 6:04 PM

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवून ठेवले नाही, हे संबंध त्यांनी कुटुंब आणि पत्नीपासून लपवून ठेवलेले नव्हते ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारीक अर्थाने घ्यायची म्हटल्यास मर्दपणाची आहे

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी दिलेले स्पष्टीकरण, स्पष्टता आणि सहजता यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यात संबंध निर्माण झाले असण्याची शक्यता कमी धनंजय मुंडे यांनी त्यांची कायदेशीर पत्नी लिव्ह इन रिलेशनशिपमधील सहकारी आणि एकूण पाचही अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळली आहे ती असमानतेची किंवा अन्यायाची दिसत नाही

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तर प्रकरणाच्या चौकशीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदरीत महाविकास आघाडीकडून घेतली जात आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंना विविध स्तरांवरून पाठिंबाही मिळत आहे. आता मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवून ठेवले नाही, हे संबंध त्यांनी कुटुंब आणि पत्नीपासून लपवून ठेवलेले नव्हते ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारीक अर्थाने घ्यायची म्हटल्यास मर्दपणाची आहे, असे खेडेकर यांनी म्हटले आहे.धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले आहे. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण, स्पष्टता आणि सहजता यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर करतो. मी आणि धनंजय मुंडे एकमेकांना नावानिशी ओळखत नाही. मात्र मी त्यांच्या पाठीशी स्वेच्छेने उभा राहत आहे, असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे २००३ पासून संबंधांमध्ये होते. ही बाब त्यांच्या मतदारसंघातील सर्वांना तसेच कुटुंबीयांना माहिती होती. करुणा शर्मा यांनीही सोशल मीडियावर आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याची कबुली दिलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यात संबंध निर्माण झाले असण्याची शक्यता कमी आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतचे संबंध जाहीरपणे स्वीकारले आहेत. त्यामुळे रेणू शर्मांसोबत शारीरिक संबंध असते तर त्यांनी ते कबुल केले असते, असेही खेडेकर म्हणाले.धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवलेले नाही. त्यांनी हे संबंध आपल्या कुटुंबापासून आणि पत्नीपासूनही लपवले नव्हते. ही बाब उमदेपणाची आणि मर्दपणाची आहे. विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची आणि समाजमान्यता देणारी आहे, असा दावाही खेडेकर यांनी केला.सध्या समाजात प्रतिष्ठित आणि सेलेब्रिटीचा दर्जा बाळगणारे पुरुष एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध प्रस्थापित करतात आणि पहिल्या पत्नीला घटस्फोटासारख्या कायदेशीर हत्याराने दूर करतात. त्या महिलांच्या उर्वरित आयुष्याची राखरांगोळी करतात. समाज अशा महिलेवर झालेल्या अन्यायाला शोषणाला योग्य ठरवतो. अशावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांची कायदेशीर पत्नी लिव्ह इन रिलेशनशिपमधील सहकारी आणि एकूण पाचही अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळली आहे ती असमानतेची किंवा अन्यायाची दिसत नाही. मात्र करुणा शर्मा ही त्यांची लिव्ह इनमधील सहकारी आणि रेणू शर्मा या महिलेचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFamilyपरिवारPoliticsराजकारण