devendra fadnavis maharashtra budget session 2021 narhari zirwal about free fastag | FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा अध्यक्ष महोदयांना मिश्किल सवाल

FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा अध्यक्ष महोदयांना मिश्किल सवाल

ठळक मुद्देआमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख झिरवळ यांनी केला होता.देवेंद्र फडणवीस यांनी केला मिश्किल सवाल

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. कामकाजाला सुरूवात झाल्यापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवण्यात येत आहेत. परंतु आज सभागृहात घडलेल्या एका प्रसंगांमुळे संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेचे काळजीवाहून अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाचलेल्या सूचनेनंतर सभागृहात हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
 
सभागृहाचं कामकाज सुरू असताना झिरवळ यांनी एक सूचना वाचली. दरम्यान, विधानसभेच्या सदस्यांना FASTag चं मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं याद्वारे सांगण्यात आलं. परंतु ही सूचना वाचताना झिरवळ यांना फास्टॅगचा उल्लेख फॉस्टिंग असा केला. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली. यानंतर झिरवळ यांनी ही सूचना घाईघाईत वाचताना आमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं म्हटलं. 

दरम्यान, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उभं राहत नरहरी झिरवळ यांना एक प्रश्न केला. अध्यक्ष महोदय FASTag हा गाड्यांना लावाचा की आमदारांना असा मिश्किल सवाल त्यांनी यावेळी केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता. 
 

Web Title: devendra fadnavis maharashtra budget session 2021 narhari zirwal about free fastag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.