Coronavirus: "जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही", या राज्यातील मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:33 AM2021-07-22T09:33:25+5:302021-07-22T09:36:18+5:30

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्याचा दावा केला आहे.

Coronavirus: Until the corona is exhausted Until then, I will not take food, Pledge of Ministers in Uttar Pradesh | Coronavirus: "जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही", या राज्यातील मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा

Coronavirus: "जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही", या राज्यातील मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा

Next
ठळक मुद्देअन्य देशांच्या तुलनेत पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या साथीला नियंत्रित केलेयोगींच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात अक्राळविक्राळ रूप घेतलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहेकोरोना नामक शत्रू माझ्या प्रिय भरतातून आणि संपूर्ण जगातून नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही

लखनौ - गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्याचा दावा केला आहे. (Coronavirus in Uttar Pradesh)जोपर्यंत देशातून कोरोनाच्या संसर्गाचा खात्मा होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा गुप्ता यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून आपण अन्न ग्रहण करत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Until the corona is exhausted Until then, I will not take food, Pledge of Ministers in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशमधील राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी सांगितले की, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी अन्न ग्रहण न करण्याचा पण केले होता. त्यामुळेच आज देशामध्ये दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे आणि त्याचे कंबरडे मोडले आहे, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रनायकच नाही तर विश्वनायक असल्याचा उल्लेख केला. नरेंद्र मोदींनी ब्राझीलला संजीवनी दिली आहे. अमेरिकेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांची स्तुती केली आहे. महेश गुप्ता यांनी योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सातत्याने राज्यातील विविध भागांचे दौरे केले. त्यांना स्वत:ला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र तरीही त्यांनी आपल्या जीवनाची पर्वा न करता जनतेच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.

महेश गुप्ता म्हणाले की, आज योगींच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात अक्राळविक्राळ रूप घेतलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता उत्तर प्रदेश पूर्णपणे तयार आहे. मुलांसाठी वेगळे वॉर्ड तयार केले आहेत. तसेच आवश्यक मशिनरी लावण्यात आली आहे.

राज्यमंत्री गुप्ता यांनी सांगितले की, अन्य देशांच्या तुलनेत पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या साथीला नियंत्रित केले आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र मी प्रार्थना करतो की, तिसरी लाट भारतात आणि उत्तर प्रदेशात येऊच नये. त्यासाठीच मी भीष्म प्रतिज्ञा केली आहे. की हा कोरोना नामक शत्रू माझ्या प्रिय भरतातून आणि संपूर्ण जगातून नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.  

English summary :
Until the corona is exhausted Until then, I will not take food, Pledge of Ministers in Uttar Pradesh

Web Title: Coronavirus: Until the corona is exhausted Until then, I will not take food, Pledge of Ministers in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app