Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:35 AM2021-07-22T10:35:45+5:302021-07-22T11:18:57+5:30

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Coronavirus: No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope | Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

Next

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. (Coronavirus in Maharashtra) दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. (No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन एका रुग्णालयातील २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राजेश टोपे यांनी या हलगर्जीपणाबाबत माहिती घेण्यासाठी या घटनेचा तपास केला जाईल, अशे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातीत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारच्या या विधानाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात कोर्टात गेले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला होता. दरम्यान, यावर भाजपानेही जोरदार पलटवार केला होता. त्यात म्हटले होते की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारांनी दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे कोर्टात सांगितले होते. केंद सरकारने दिलेले उत्तर हे त्याच उत्तरावर आघारित आहे, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, संसदेमध्ये केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून उत्तर दिले होते. कुठल्याही राज्याने ऑक्सिजनच्या टंचाईमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दिला नव्हता. पात्रा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनीही असाच दावा केला होता.  

Read in English

Web Title: Coronavirus: No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.