शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

CoronaVirus Live Updates : "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:30 AM

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over Corona Vaccine : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण मोहीम  सुरू आहे. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" असं म्हटलं आहे. तसेच हा धोरण लकवा (पॉलिसी पॅरालिसिस) असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जोपर्यंत आपण भारतातील लोकांचं लसीकरण पूर्ण करत नाही, तोपर्यंत लोकांचे जीव वाचवू शकत नाही, असं सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत. हे करायचं असेल तर मोदी सरकारला हे निश्चित करावं लागेल की, प्रत्येक महिन्याला 300 मिलियन डोस दिले जातील आणि लोकांचं लसीकरण केलं जाईल. पण ते यात अपयशी ठरले आहेत" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

"लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांनी उशिराने लशींची ऑर्डर दिली. आपल्याकडे पारदर्शकता नाही. ते लोक खोटं सांगताहेत की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस चार आठवड्यांनी घ्यावा. हे सहा आठवड्यांसाठी पुन्हा स्थगित करण्यात आलं. आता हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा आहे. यातून धोरण लकवाच (पॉलिसी पॅरालिसिस) दिसून येत आहे" अशा शब्दांत ओवैसी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील ओवैसी यांनी केली होती.

"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल

"पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी" असं ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन