शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:19 AM

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. काही ठिकाणी वैद्यकीय साधनसामुग्रीचीही मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच काल रात्री नालासोपारा येथे ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. त्यावरून आता भाजपाने ( BJP MLA Atul Bhatkhalkar ) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  (coronavirus: "Death could have been prevented if oxygen had been stored instead of collecting ransom" BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Maharashtra Government )

या घटनेवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला भातखळकर यांनी या ट्विटमधून लगावला आहे. 

दरम्यान, गंभीर कोरोना रुग्णांना दाखल करून घेणारे आमचे रुग्णालय या परिसरातील एकमेवर रुग्णालय आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांना सहव्याधी होत्या, असे स्पष्टीकरण या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले आहे. दरम्यान, नालासोपाऱ्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्याबाबतीत वसई-विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  १२ एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये ७ व रिद्धी विनायक या खासगी रुग्णालयामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला ही बातमी वस्तुस्थितीस अनुसरून नाही. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होता. किंबहुना वसई-विरार महानगरपालिका परिक्षेत्रात एकूण ८ खासगी कोविड रुग्णालये असून, अशा प्रकारे ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब इतर कोणत्याही रुग्णालयात उद्भवलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAtul Bhatkalkarअतुल भातखळकर