Coronavirus:"कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:47 PM2021-05-15T20:47:42+5:302021-05-15T20:47:49+5:30

Maharashtra Politics News: - कोरोनाच्या फैलावावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.

Coronavirus: BJP Spokeperson Keshav Upadhye Says "Will Nana Patole dare to say anything to the Chief Minister of Maharashtra?" | Coronavirus:"कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

Coronavirus:"कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

googlenewsNext

मुंबई - कोरोनाच्या फैलावावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत असेच पत्र नरेंद्र मोदी यांना लिहा असे प्रतिआव्हान दिले होते. दरम्यान, आता नाना पटोले यांना भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देण्यापेक्षा कोरोनाचा हाहाःकार असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याना काही सांगण्याचं धाडस करणार का? काँग्रेस सत्तेत असूनही आणि दोन्ही पक्ष ढुंकूनही विचारतच नसले तरी जनहितासाठी मुख्यमंत्र्याना खरी परिस्थिती सांगण्याचे धाडस दाखवाल का? असा खरमरीत प्रश्न उपाध्ये यांनी त्यांना विचारला आहे. 

दरम्यान, आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि भोंगळपणा जबाबदार आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.   

Web Title: Coronavirus: BJP Spokeperson Keshav Upadhye Says "Will Nana Patole dare to say anything to the Chief Minister of Maharashtra?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.