"साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:02 IST2021-04-19T09:55:53+5:302021-04-19T10:02:08+5:30
Maharashtra Politics News : बनावट रेमडेसिविर रॅकेटमधील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

"साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’
मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात महाराष्ट्राला तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र महाराष्ट्रात कोरोनासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. (Fake Remdesivir racket) यातील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP for Fake Remdesivir racket)
या घटनेची बातमी शेअर करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा लावतात लोकांना चुना. हे शक्य झालंय साहेबांच्या धोरणामुळे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम. राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 18, 2021
हे शक्य झालंय साहेबांच्या धोरणामुळे! pic.twitter.com/mgWaAtYCWc
दरम्यान, बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. या बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर),संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे.