कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 07:33 PM2021-02-07T19:33:30+5:302021-02-07T19:34:35+5:30

Anil Deshmukh, NCP news : अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

Corona positive Anil Deshmukh attends the NCP program via video conferencing | कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी

कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी

googlenewsNext

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आज एका कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे या पक्षविस्तार कार्यक्रमाला नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह झालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील उपस्थिती लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. अनिल देशमुख हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला हजर होते. (Home minister Anil Deshmukh corona Positive, attend NCP's program in nagpur.)


 राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कोराना पाॅझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी त्यांनी ट्विटरहून जाहीर केले. एक दिवसापूर्वी अर्थात गुरुवारी नामदार देशमुख दिवसभर अमरावतीत होते. भरगच्च कार्यक्रमादरम्यान त्यांचा अनेक महत्त्वाच्या लोकांशी संपर्क आला. त्या सर्वांची धडधड आता वाढली आहे. असे असताना त्यांनी आज नागपूरच्या भरगच्च कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राष्ट्रवादीचा पक्षविस्तार जोरात असल्याची चर्चा सुरु आहे. 


अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नागपुरातील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली. केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही, असे सांगितले. तसेच सहकारी पक्षांसोबत बोलून, मुख्यमंत्र्यासोबत बोलून काय ते ठरेल पण अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित काही योजना आहेत, असेही ते सांगण्यास विसरले नाहीत.


कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारला ते परवडणारे नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी  सुरुवातीला तशी घोषणा केली, परंतू नंतर त्याबाबत वेगवेगळी संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केल्याचा आरोप पवारांनी केला. सेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याच्या वृत्ताचे अजित पवारांनी खंडन केले. आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतो. ग्राम पंचायत निवडणुकीत आम्ही भाजप पेक्षा बरेच पुढे राहिलो. येणाऱ्या जिल्हा परिषद  निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा दावाही पवारांनी केला. 


अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले. प्राणी संग्रहालयाच्या कार्यक्रमात आले होते. गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्याने धरणाची स्थिती समाधानकारक आहे, असेही पवार म्हणाले. 

Web Title: Corona positive Anil Deshmukh attends the NCP program via video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.