शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पक्षाविरोधात बोलणाऱ्यांवर काँग्रेसमध्ये कारवाई; आनंद शर्मांचे वादग्रस्त ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 4:31 AM

नरेंद्र मोदींची ट्वीटमध्ये केली होती प्रशंसा

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाने आता पक्षातील जे नेते पक्ष धोरणाविरोधात जाऊन वक्तव्ये करीत आहेत त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घ्यायचे ठरविले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस उत्पादक कंपन्यांना भेट दिल्यानंतर केलेल्या ट्वीटनंतर काँग्रेस नेतृत्वाने ही कठोर भूमिका घेतली. 

शर्मा यांनी मोदी यांची त्यात प्रशंसाही केली होती. ट्वीटची माहिती होताच काँग्रेस श्रेष्ठींनी १०, जन पथवरून आनंद शर्मा यांना फोन आला व इशारा मिळाला की, जर तुम्हाला वेगळा मार्ग निवडायचा असेल तर निवडावा. पक्षात राहून पक्ष धोरणाविरोधात बोलण्याची परवानगी मिळणार नाही.  आनंद शर्मा यांच्यासाठी हा मोठा झटका होता. त्यांनी भूमिका मांडताना पक्षश्रेष्ठींना खात्री दिली की, मी ताबडतोब ट्वीट दुरुस्त करीत आहे. काहीच मिनिटांत शर्मा यांनी दुसरे ट्वीट केले व त्यात मोदी यांच्याऐवजी वैज्ञानिकांची प्रशंसा केली. काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केलेल्या २३ जणांच्या गटाचे आनंद शर्मा सदस्य होते. या गटाच्या पत्राने खळबळ निर्माण केली होती.

राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता कमीउल्लेखनीय आहे की, आनंद शर्मा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल २०२२ मध्ये संपत आहे. ते हिमाचल प्रदेशातून २०१६ मध्ये निवडून आले आहेत. आता काँग्रेसकडे शर्मा यांना पुन्हा निवडून पाठवता येईल एवढी सदस्य संख्या नाही. सूत्रांनी सांगितले की, आनंद शर्मा अस्वस्थ होण्याचे हे मोठेे कारण आहे. असेच संकट   ग्रुप २३ चे सदस्य गुलामनबी आझाद यांच्यासमोर आहे. त्यांनाही २०२१ नंतर राज्यसभेची जागा मिळेल, असे दिसत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस