शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव; काँग्रेसचा गौप्यस्फोट

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 15:24 IST

Congress Sachin Sawant Allegation on BJP over MP Mohan Delkar Suicide Case: सदर व्यक्ती ही भाजपाचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र विकास आघाडी सरकारने डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावीकाँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट काही दिवसांपूर्वीच संसदेत मागच्या अधिवेशनातील आपल्या भाषणात त्यांनी यासंदर्भातील आपली व्यथा मांडली होती

मुंबई – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती, या आत्महत्येनंतर पोलिसांना त्यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली, जवळपास १४-१५ पानांचे हे पत्र होतं, त्यात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत होतं, त्यातच आता भाजपाच्या बड्या नेत्याचं नाव या सुसाईड नोटमध्ये असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. (BJP Praful Patel's name in MP Mohan Delkar suicide Case note, Congress Sachin Sawant allegation)

याबाबत सचिन सावंत म्हणाले की, ज्यांच्यावर देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. अशा सातवेळा खासदार असणाऱ्या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

त्यामुळे मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून डेलकरांची मुंबईत येऊन आत्महत्या केली, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून डेलकर कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे. डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाईन मिटींगमध्ये दिले आहे.

दरम्यान, एका खासदाराला खोट्या केसेसमध्ये अडकवणे त्यांना व त्यांच्या समर्थकांना छळणे तसेच नोकरशाही, पोलीस, तपासयंत्रणा आणि स्थानिक गुंडाकडूनही त्यांची छळवणूक होणे याबाबत त्यांनी स्वतः व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. मला तुम्ही हा त्रास का देता अशी विचारणा त्यांनी केल्यावर उपरसे ऑर्डर है असे उत्तर त्यांना दिले. हा प्रकार इंग्रज काळातील छळवणुकीपेक्षाही भयंकर आहे असे डेलकर म्हणाले होते. त्याचबरोबर ते लोकसभेमध्ये आपला राजीनामा देऊन आपली व्यथा मांडणार होते. काही दिवसांपूर्वीच संसदेत मागच्या अधिवेशनातील आपल्या भाषणात त्यांनी यासंदर्भातील आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये त्यांना कशाप्रकारे खोट्या केसेसमध्ये गुंतवून बदनाम आणि अपमानित केले जाते याची कैफियत त्यांनी मांडली होती असं  सचिन सावंत यांनी सांगितले.

त्याशिवाय त्यांनी मुंबईमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी १६ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भाजपाचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव आहे असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सदर व्यक्ती ही भाजपाचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ती मान्य केली आहे. देशभरातील विविध राज्यात विरोधी पक्षाचे नेते आमदार, खासदारांना व सरकारांना अशाच प्रकारचा त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील आमदार खासदारांनाही अशाच प्रकारचा त्रास केंद्रातील भाजप सरकारकडून दिला जात आहे. डेलकरांची आत्महत्येने देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती देशात आहे असे सावंत म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसSachin sawantसचिन सावंतAnil Deshmukhअनिल देशमुखcongressकाँग्रेस