"अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 08:33 AM2020-12-17T08:33:46+5:302020-12-17T08:36:30+5:30

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over LPG Price Hike : सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over LPG Price Hike | "अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?"

"अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?"

Next

नवी दिल्ली : घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोचे सिलिंडर ५० रुपयांनी, ५ किलोचे शॉर्ट-सिलिंडर १८ रुपयांनी आणि १९ किलोचे सिलिंडर ३६.५० रुपयांनी महागले आहे. मागील १५ दिवसांत सिलिंडरच्या दरात दोन वेळा १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याच दरम्यान गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "देशाला आणखी किती लाचार करणार आहात?" असा सवाल विचारत  निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार. देशाला आणखी किती लाचार करणार आहात?" असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच LPGPriceHike हा हॅशटॅग देखील वापरला आहे. देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलोचे विनासबसिडीचे सिलिंडर आता ६४४ रुपये झाले आहे, तसेच कोलकात्यात त्याची किंमत ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ रुपये आणि चेन्नईत ६६० रुपये झाली आहे. 

एलपीजी सिलिंडरचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या निर्धारित करतात. त्यांच्या दरांचा दरमहा आढावा घेतला जातो. दरवाढीच्या आधी दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरची किंमत दिल्लीत ५९४ रुपये, कोलकात्यात ६२०.५० रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईत ६१० रुपये होती. राजधानी दिल्लीत १९ किलो सिलिंडरची किंमत ५४.५० रुपयांनी वाढली आहे. 

मेपासून सबसिडी नाहीच

सबसिडीचे वर्षाला १२ गॅस सिलिंडर एका कुटुंबाला मिळतात. खरेदीच्या वेळी ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण किंमत अदा करावी लागते. नंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कोसळल्यामुळे उत्पादन खर्च आणि बाजारातील किंमत एकाच पातळीवर आली आहे. त्यामुळे मेपासून ग्राहकांना सबसिडी मिळालेली नाही.

"मोदी सरकारसाठी विद्यार्थी देशद्रोही, शेतकरी खलिस्तानी; भांडवलदार मात्र पक्के मित्र"; राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत मात्र 'क्रोनी कॅपिटलिस्ट' (भांडवलदार) मात्र त्यांचे पक्के मित्र आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मोदी सरकारसाठी विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत. चिंता व्यक्त करणारे नागरिक शहरी नक्षलवादी आहेत. प्रवासी मजूर कोरोनाचे प्रसारक आहेत. बलात्कार पीडित त्यांच्यासाठी काहीही नाहीत. आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत आणि भांडवलदार मात्र पक्के मित्र आहेत" असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over LPG Price Hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.