शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:04 IST

गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनाचे उपचार होऊ शकतात हे DRDO आणि ICMR च्या वैज्ञानिकांनी मानलंय का? आमदाराचा सवाल.

ठळक मुद्देगोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनाचे उपचार होऊ शकतात हे DRDO आणि ICMR च्या वैज्ञानिकांनी मानलंय का? आमदाराचा सवाल.

गोमुत्र प्राशन करत असल्यानं आपल्याला कोरोनाची झाली नाही या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या वक्तव्यावरून मध्य प्रदेशचे काँग्रेसचे आमदार पीसी शर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं. तसंच त्यांनी या वक्तव्यावरून टीकाही केली. गोमुत्र प्राशन केल्यानं  कोरोनावर उपचार होऊ शकतात हे डीआरडीओ (DRDO) आणि आयसीएमआरनं (ICMR) वैज्ञानिकदृष्ट्या मान्य केलं आहे का? असा सवाल शर्मा यांनी पत्राद्वारे केला. शर्मा यांनी या पत्रासह आरोग्यमंत्र्यांना गोमुत्रदेखील पाठवलं आहे.  "मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचं पालन केलं पाहिजे," असं वक्तव्य भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केलं होतं. भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापू लागलं आहे.गोमुत्र प्राशन केल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो; मी घेते, म्हणूनच कोरोना झाला नाही : खा. प्रज्ञा सिंह ठाकुर"खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहे. तर डीआरडीओ आणि आयसीएमआरनं वैज्ञानिकदृष्ट्या गोमुत्रामुळे कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात हे मान्य केलं आहे का?," असा सवाल शर्मा यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. "यासाठीच मी तुम्हाला गोमुत्र पाठवत आहे. कोरोनानं त्रासलेल्या जनतेला वैज्ञानिकदृष्ट्या कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य संदेश द्याल अशी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले. 

दिशाभूल करण्यासाठी वापर ?"निश्चितच आम्ही गायीला माता मानतो आणि गाईचं दुध हे पौष्टीक असतं. गायीच्या गोबराचं आणि गोमुत्राचं धार्मिक महत्त्वदेखील आहे. परंतु या धार्मिक भावनेचा वापर जनतेची दिशाभूल करण्यासाठी केला जातोय का?  कोरोना, ब्लॅक फंगस यांच्यावर उचार हे ऑक्सिजन, रेमडेसिवीर. एम्फोटेरिसिन इंजेक्शन किंवा टोसिलिजुमॅब इंजेक्शन यांच्यापासून न होता गोमुत्रानं होणार आहे? आता काय लसीकरणाची आवश्यकता नाही?," असं सवालही त्यांनी केले आहेत.

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपाcongressकाँग्रेसDRDOडीआरडीओcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य