Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 11:33 AM2021-06-07T11:33:10+5:302021-06-07T11:34:09+5:30

Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar today: महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती.

Congress minister Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar on silver oak | Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सिल्व्हर ओकवर राजकीय नेत्यांच्या भेटी सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, संभाजी राजेंनी गेल्या आठवड्याभरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. आता महाविकास आघाडीतील दुरावे पाहता आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पवारांची भेट घेतली आहे. (Balasaheb thorat meet sharad pawat today on Silver oak)


महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती. यावर वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जर दुसऱ्यांच्या अखत्यारीतील, खात्यांचे निर्णय मीडियासमोर जाहीर करत असतील, तर मी काय चुकीचे केले, अशी नाराजी व्यक्त केली होती. यावरून तिन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. 



या साऱ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या निवासस्थानी जात काँग्रेस नेते थोरात यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये काय बोलणे झाले, याची माहिती देण्यात आली नाही. परंतू ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले गेले. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी सत्ताधारी मित्रपक्षातील नेते आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचले होते.


 

Web Title: Congress minister Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar on silver oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.