लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:40 AM2024-05-08T09:40:10+5:302024-05-08T09:40:36+5:30

एका चाहत्याने अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. दुबईत ही कॉन्सर्ट सुरु होती.

Arijit Singh started cutting his nails while performing in live concert trolled by netizens Video viral | लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

गायक अरिजीत सिंहचे (Arijit Singh) जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या इंडस्ट्रीतील तो नंबर एकचा गायक आहे. त्याची गाणी चाहत्यांच्या थेट काळजाला भिडतात. तसंच अरिजीतच्या साधेपणाचाही चाहत्यांना हेवा वाटतो. तो खूप 'डाऊन टू अर्थ' असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मात्र अरिजीत सध्या एका  वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होतोय. लाईव्ह कॉन्सर्टमध्येच अरिजीत अचानक नेलकटरने नखं कापायला लागतो. हे पाहून नेटकऱ्यांनी 'अनप्रोफेशनल' अशी टिप्पणी केली आहे.

एका चाहत्याने अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. दुबईत ही कॉन्सर्ट सुरु होती. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की अरिजीत परफॉर्म करत असतानाच अचानक नेलकटरने स्टेजवरच नखं कापत आहे. त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे. तर डोक्यावर पिवळी पगडी आहे. त्याच्या शर्टवर भारताच्या तिरंगाचं स्टीकरही दिसतंय. परफॉर्मन्सच्या धुंदीत असतानाच तो थोडा पुढे प्रकाशात येत नखं कापायला लागतो तेव्हा सगळेच शॉक होतात. पण अरिजीत परफॉर्मन्समध्ये ब्रेक घेत नाही. काहींना त्याचं हे कृत्य आवडलेलं नाही तर काही जणांनी त्याची बाजूही घेतली आहे.

अरिजीत सिंहच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. 'अनप्रोफेशनल','बॅकस्टेज जाऊनही नखं कापू शकला असतास','हे अस्वच्छतेचं लक्षण आहे' अशा कमेंट्स करत त्याला ट्रोल करण्यात आलंय. मात्र 'कदाचित त्याला गिटार वाजवताना वाढलेल्या नखांमुळे अडचण येत असेल' असं म्हणत काही युझर्सने त्याची बाजूही घेतली आहे.

Web Title: Arijit Singh started cutting his nails while performing in live concert trolled by netizens Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.