मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरणात समोर आलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण स्फोटक बनलं आहे. स्फोटक प्रकरणात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात, त्यामुळे अडचणीत आलेलं सरकार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यावरून भारतीय जनतापक्ष आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्येही ऑल इज वेल नसल्याचं दिसतं आहे. देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाणशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावं लागलं असं एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा 'रोखठोक' सवाल राऊत यांनी विचारला.
मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 14:40 IST