शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय अजेंड्याबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:57 IST

Prashant Kishore : बिगरभाजप नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा; काँग्रेसकडूनही चाचपणी

ठळक मुद्देबिगरभाजप नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा; काँग्रेसकडूनही चाचपणीप्रादेशिक पक्षांचे किंगमेकर होण्याची महत्वाकांक्षा?

वेंकटेश केसरी

नवी दिल्ली : निवडणुकांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिगरभाजप पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा लावला आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व त्या पक्षाचे नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे प्रशांत किशोर सातत्याने टाळत आहेत. या घडामोडींमुळे त्यांचा नेमका राजकीय अजेंडा काय आहे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

मूळचे बिहारचे रहिवासी असलेल्या प्रशांत किशोर यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काम केले होते. त्या निवडणुकांत भाजप विजयी झाला. निवडणूक जिंकण्यासाठी आखत असलेली रणनीती व ज्या पक्षासाठी काम करतात त्याला मिळालेले यश या दोन्ही गोष्टींमुळे काही राजकीय पक्षांनी प्रशांत किशोर यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदींची साथ सोडल्यानंतर ते काही काळ जनता दल (यू) या पक्षात कार्यरत होते. त्यावेळेपासून प्रशांत किशोर बिगरभाजप पक्षांचे अत्यंत लाडके बनले. आता भाजपला रोखण्यासाठी ते उपयोगी ठरतात का याची चाचपणी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडून केली जात आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसची सरशी झाली. त्या पक्षासाठी प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीती आखली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही गेल्या काही दिवसांत तीनदा भेट घेतली होती. पुढील वर्षी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होईल. पंजाबमध्येही आगामी विधानसभा निवडणुका आहेत. २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका येतील. या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांनी चर्चा केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रशांत किशोर यांनी वायएसआर काँग्रेस, जनता दल (यू), द्रमुक यांनाही निवडणूक रणनीती आखून दिली होती. उत्तर प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेससाठीही अशा प्रकारचे काम केले होते. प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर करावे तसेच ब्राह्मण मतदारांना आपल्या बाजूने वळवून घ्यावे असे प्रशांत किशोर यांनी सुचविले होते. मात्र निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अचानक समाजवादी पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला आणि बसपने त्यात खोडा घातला.

प्रादेशिक पक्षांचे किंगमेकर होण्याची महत्वाकांक्षा?प्रशांत यांनी निवडणूक रणनीती तयार करावी याकरिता शिरोमणी अकाली दल, बसप, बिजू जनता दलाने त्यांना संपर्क साधल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे तसेच अरविंद केजरीवाल यांच्या आपशी, राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांशी प्रशांत यांचे उत्तम संबंध आहेत. प्रशांत किशोर यांची खासदार बनण्याची इच्छा नाही. त्यांना प्रादेशिक पक्षांचे किंगमेकर बनण्याची महत्वाकांक्षा आहे असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरPoliticsराजकारणIndiaभारतcongressकाँग्रेस