UP Election: “योगी आदित्यनाथांसोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार”: केशव प्रसाद मौर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 03:04 PM2021-06-23T15:04:08+5:302021-06-23T15:07:47+5:30

UP Election: गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी गेले. 

up cm yogi adityanath visit deputy cm keshav prasad maurya at his home | UP Election: “योगी आदित्यनाथांसोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार”: केशव प्रसाद मौर्य

UP Election: “योगी आदित्यनाथांसोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार”: केशव प्रसाद मौर्य

Next
ठळक मुद्देसाडेचार वर्षानंतर योगी आदित्यनाथ केशव प्रसाद मौर्य यांच्या घरीएकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चाकाही झाले, तरी योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर राहणार: मौर्य

लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपसह अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. यातच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आधीही होतो, आताही आहे आणि पुढेही कायम असेन, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. (up cm yogi adityanath visit deputy cm keshav prasad maurya at his home)

उपमुख्यमंत्री असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांनी यावेळी सांगितले की, अलीकडेच माझ्या मुलाचा विवाह संपन्न झाला. त्यामुळे नवरदेव आणि पुत्रवधूला आशीर्वाद देण्यासाठी योगी आदित्यनाथ आले होते. ही आनंदाची बाब आहे. राजकारणाबाबत बोलताना मौर्य म्हणाले की, आम्ही एकत्र आहोत. कोणीही मधे आले, तरी आता त्यात खंड पडणार नाही.

फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

अब की बार ३०० पार

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ३०० जागा मिळतील, असा दावा करत निषाद पार्टीसह अन्य सहयोग पक्षांशी उच्च स्तरावर बोलणी सुरू आहेत. चर्चा, बैठका यांचे सत्र सुरूच आहे. सप, बसप आणि काँग्रेस एकत्र आले, तरी भाजपला पराभूत करू शकत नाही, असा विश्वास मौर्य यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी गेले. 

“PM मोदींचे केवळ नावच पुरेसे, युपी निवडणुका भाजप नक्की जिंकेल”

एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न

केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या विवाहाचे निमित्त असले, तरी योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिग्गज नेतेही यावेळी उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. यामुळे आम्ही एकत्र आहोत, असा एकजुटीचा संदेश देण्याचा हा एक प्रयत्न होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. भाजप नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (संघटन) बी. एल. संतोष, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: up cm yogi adityanath visit deputy cm keshav prasad maurya at his home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app