शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही : डॉ नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 20:45 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडून या असे सांगितले नाही.

पुणे : भाजपने शह कटशहाचे राजकारण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवून विषारी प्रचार केला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडून या असे सांगितले नाही. बाहुबलीचे राजकारण केले नाही. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना ग्रामीण जनतेने साथ दिली आहे. ग्रामपंचायतींप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या यशाबद्दल  त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, शिवसेनेला संपवू शकतो असा अनेकांना भ्रम होता, राष्ट्रपती राजवट आण्यासाठी महाराष्ट्रात कशी बेबंदशाही सुरु आहे असे वातावरण निर्माण केले होते, त्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतपेटीतून चपराक दिली आहे. भाजपच्या विषारी प्रचाराला जनता बळी पडलेली नाही. या निवडणूकीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपच्या अपप्रचाराला जनतेने उत्तर दिले आहे. पुढील काळात ग्रामपंचायतीचे काम कोणतेही हितसंबंध आड येऊ न देता ग्रामविकासासाठी महाराष्ट्र शासन सर्व ग्रामपंचायतींच्या मागे ठामपणे उभे असेल.......

'प्रबोधन महोत्सवा'त प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २० ते २६ जानेवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवात सहभागी होंणार असून या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार आहे.

प्रबोधन महोत्सवाचे उद्घाटन २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना उपनेत्या, डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषेदत दिली. संवाद पुणेचे सुनील महाजन यावेळी उपस्थित होते.

प्रबोधन महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने,  प्रबोधनकार ठाकरे यांच्या ध्वनिमुद्रीत भाषणे, राजकीय क्षेत्रातील महिला आणि युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार ठाकरे लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन, छायाचित्र-व्यंगचित्रांचे प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या महोत्सवामध्ये होणार आहेत.

बालगंधर्व कलादालनात प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थित होणार आहे.२२ आणि २३ जानेवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प सुरेश राऊत हे साकारणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा