“सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 01:49 PM2020-09-13T13:49:46+5:302020-09-13T13:52:17+5:30

मराठा आरक्षणाबाबत सरकार अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray appeal to Maratha Community over Reservation stay in Supreme Court | “सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

“सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या बदनामीचा डाव जो आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणारमराठा समाजाच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीतकोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत - मुख्यमंत्री

मुंबई – मराठा आरक्षणाची लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले तेच आहेत, सर्वोत्तम वकील राज्य सरकारने दिले आहेत. कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना सरकार कुठेही कमी पडले नाही, इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न मांडले जातात तशी मोठ्या बेंचसमोर आम्ही सुनावणीची मागणी केली. पण अनपेक्षितपणे स्थगितीची गरज नसतानाही कोर्टाने आरक्षणाच्या अंमलबजावणी स्थगिती दिली असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही या प्रश्नावर विविध तज्ज्ञांची बोलून कोर्टाची रणनीती आखत आहे. सर्वांची मते लक्षात घेऊन कोर्टात काय गाऱ्हाणं मांडायचं, कोणासमोर मांडायचा, विरोधी पक्षनेत्याशी बोललो आहे, तेदेखील सोबत आहे. मराठा समाजाच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत, सरकार तुमच्या पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? हे सरकार तुमचं आहे. कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. तुमच्या सूचना सरकारने घेतल्या आहेत. कायदेशीररित्या दिलासादायक मार्ग काय घेता येईल यावर सरकार काम करत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव जो आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे. महाराष्ट्रात वाताहात झालीय असं वातावरण नाही, राज्य सरकार जनतेच्या आशीर्वादाने खंबीरपणे पुढे चाललं आहे. मुख्यमंत्री घरात बसून काम करतात त्यांना सांगतो, तुम्ही ज्या दुर्गम भागात गेला नाही तिथे मी व्हिडीओच्या माध्यमातून पोहचलो आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, दुसरी लाट येतेय की काय याची भीती,अधिवेशन यशस्वी पार पडण्यासाठी सर्व पक्षाचे आभार, कोरोनाला घाबरण्याचं काम नाही पण खबरदारी घ्यायला हवी. जबाबदारी तुमच्या खांद्यावरही टाकणार आहे. काही गोष्टींची खबदारी तुम्ही घ्यायची आहे. आम्हीदेखील काही खबरदारी घेऊ. येत्या १५ तारखेपासून जो कोणी महाराष्ट्रावर प्रेम करतो, मुंबईला आपलं मानतो, त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे मोहिमेचं नाव आहे. महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या सुरक्षेसाठी तोंडावर मास्क घालून फिरलं पाहिजे असं ते म्हणाले.

तसेच बाहेर जाणं टाळलं, चारचौघात सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा, ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय कारण उद्योगधंद्यासाठीही ऑक्सिजन लागत आहे. पण आरोग्य खात्यासाठी ८० टक्के ऑक्सिजन बंधनकारक केलं आहे. ही परिस्थिती अवघड वाटत असली तरी अशक्य नाही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात सर्वांची चाचणी अवघड आहे. परंतु किमान २ वेळा शासकीय यंत्रणा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करण्यास येईल. यात ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार प्रत्येकाने आपला वाटा घेतला तर हे शक्य होईल. कुटुंबातील आरोग्य तपासणी केली त्यांना काही समस्या आहेत यावरुन आपण त्यांच्यावर उपचार करु, व्हायरस कुटुंबापर्यंत पोहचण्याआधीच शासकीय यंत्रणा त्या कुटुंबापर्यंत पोहचेल असंही त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी मास्कचा वापर तिथे मास्क काढून गप्पा मारण्याचे प्रकार पाहत आहे. कायद्याने सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे का? मास्क घातलं नाही तर दंड करावा लागणार, गर्दी झाली तर कारवाई करणार, आयुष्यात जगावरील सर्वात भयानक संकट आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोना काळातही राज्यात साडे २९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सरकार शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.

राज्यातील साडेसहा लाख कुपोषित बालकांना पुढील वर्षभर मोफत भोजन देणार

शिवभोजन थाळी ५ रुपयात दिली, पावणेदोन कोटी थाळ्या राज्यभरात दिल्या जातात.

कोरोनासाठी ३० लाख ६० हजार बेड्स उपलब्ध आहे, यात ऑक्सिजन, आयसीयू आणि सामान्य बेड्सचा समावेश आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे बेड्सची संख्या वाढवतो आहे.

औषधांचा पुरवठा करण्यात कमी पडत नाही, अशी कोणतीही बाब शिल्लक ठेवली नाही जिथे सरकार म्हणून कमी पडलो आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागासाठी ७०० कोटी मदत केली आहे. पूर्व विदर्भात तात्काळ १८ कोटी मदत पाठवली आहे. विदर्भाला संपूर्णपणे मदत करणार याचं आश्वासन

अनेक संकटे आली तर सरकार तुमच्या पाठिशी आहे, शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाही, म्हणून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. शेतकरी कोरोना संकटात आपल्याला जगवतोय. आयुष्य गहाण टाकून पिकं उभी करतो. डोक्यावर कर्जाचं बोझं होतं, त्यामुळे यापुढे जे विकेल तेच पिकेल असं सरकार योजना आणतं आहे. कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे, तेच पिकवलं जाईल. जे विकणार असेल तेच आम्ही पिकवू.

कोरोनासाठी घ्यावयाच्या खबरदारी

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे

बाहेरुन आल्यानंतर बूट बाहेर काढा, हात-पाय धुवावे, कपडे गरम पाण्याने धुवावे

सोशल डिस्टेंसिंग पालन करावं, एकमेकांच्या तोंडासमोर बोलू नये

ऑनलाईन खरेदीवर जास्त भर द्यावा, बाजारात गर्दी करु नये, गर्दीची वेळ टाळून बाजारात जावे.

मित्रांसोबत जेवताना समोरासमोर बसू नका, संसर्ग टाळण्यास त्यामुळे मदत होईल.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray appeal to Maratha Community over Reservation stay in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.