शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राज्यपाल नियुक्त सदस्य, नावे अंतिम करण्याचे मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:15 IST

Maharashtra Politics News : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नावांच्या बाबतीत प्रचंड गुप्तता बाळगली  आहे. राज्यपालांकडे जोपर्यंत  नावांची यादी जाणार नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणतेही तर्कवितर्क लढविण्यात अर्थ नाही, असेही  एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

मुंबई : राज्यपालांच्या मार्फत विधानपरिषदेवर नेमण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नावे अंतिम करण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. विधानपरिषदेवर कोणत्या १२ सदस्यांना नेमायचे याची शिफारस मंत्रिमंडळाच्या वतीने करण्यात येते. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात आला होता.  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नावांच्या बाबतीत प्रचंड गुप्तता बाळगली  आहे. राज्यपालांकडे जोपर्यंत  नावांची यादी जाणार नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणतेही तर्कवितर्क लढविण्यात अर्थ नाही, असेही  एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काँग्रेसने त्यांच्या चार नावांची  यादी मुख्यमंत्री ठाकरे  यांच्याकडे  दिली असे सांगण्यात येत असले, तरीही काँग्रेसकडून मात्र याविषयी काहीही सांगण्यास नकार देण्यात आला आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगलीला रवाना झाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बैठकीनंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.  त्यामुळे थोरात यांनी काँग्रेसच्या चार लोकांची नावे मुख्यमंत्र्यांकडे दिली अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात काँग्रेसची नावे अद्याप दिल्लीहून आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.राष्ट्रवादीची नावे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत निश्चित होतील.  तर शिवसेनेची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः निश्चित करणार आहेत.  शुक्रवार ते रविवार तीन दिवस मंत्रालयाला सुट्टी आहे. त्यामुळे हा विषय आता थेट सोमवारी चर्चेला येईल. सोमवारी कदाचित मुख्यमंत्र्याच्या वतीने बारा सदस्यांच्या यादीचे पत्र राज्यपालांकडे पाठवले जाईल, असे सांगण्यात येत आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  १२ जागांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. नावांबाबत गुप्तता पाळली जात आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस