महाविकास आघाडीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतराबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:57 IST2020-12-19T14:55:44+5:302020-12-19T14:57:12+5:30
Chhagan Bhujbal News : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे.

महाविकास आघाडीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतराबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान, म्हणाले...
नाशिक - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात केलेल्या सत्तास्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीने आपले बळ दाखवून दिले आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.
महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याच्या घटनांमुळे उदभवलेल्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार असल्यास त्याबाबत तिन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठीच मिळून निर्णय घेतील.
दरम्यान, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि नंतर विविध शहरांत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे सध्या भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.